पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १४७९ रुग्ण आढळल्याने, ४५  हजार ५४४ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर १ हजार १३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ८१७  रुग्णांची तब्बेत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर २६ हजार ७२५ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरीत ८४३ नवे रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ८४३ जण करोना बाधित रुग्ण आढळले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ५३८ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५९० वर पोहचली आहे, पैकी ९ हजार ५८७ जण आत्तापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार २८९ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य प्रशासनाने दिली आहे.