पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १,५२२ रुग्ण आढळले. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला. करोनावर उपचार घेणार्‍या १,४१२ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे.

आजच्या बाधितांच्या संख्येनुसार शहरातील एकूण रुग्णसंख्या ७४ हजार ९८ एवढी झाली आहे. तर आजअखेर १ हजार ७३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आजवर ५७ हजार ६५७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात नव्याने ९६२ करोनाबाधित रुग्ण आढळले असून २५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ६०४ जण आज करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ३९७ वर पोहचली असून यांपैकी २४ हजार ९८१ जण करोनामुक्त झाले आहेत.

सध्या महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार २०४ इतकी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.