पुणे शहरात दिवसभरात २९८ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ७५ हजार ४१५ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ५६४ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान २७६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ६५ हजार ७९० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १२२ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ९८ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात दहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९५ हजार ७० वर पोहचली असून पैकी, ९१ हजार ७०७ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ७१९ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.