सासवडजवळील पानवडी घाटात आज सकाळी पोलिसांची नाईट पेट्रोलिंग गाडी कोसळून झालेल्या भीषण अपघातात तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पोलीस त्यांच्या गाडीमधून रात्रीच्या गस्तीसाठी जात असताना पानवडी घाटात एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी ३०० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये तीन पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. जखमी पोलिसांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात मृत पावलेले पोलीस
१) शशिकांत निवृत्ति राऊत वय-  ५२ पो.हवा.६४२ रा.ऊरुळी कांचन,हवेली, पुणे
२) अविनाश तूकाराम ढोले वय-५२ पो. हवा.२२  (चालक) रा.वडगांव निंबाळकर
३) उल्हास अनंत मयेकर पो.हवा.११२० रा. भेकराई नगर, हडपसर,पुणे