News Flash

एकाच भागात ३ आत्महत्यांच्या घटनांनी हादरलं पिंपरी-चिंचवड

आत्महत्या केलेल्यांमध्ये एका संगणक अभियंत्याचाही समावेश

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी दिवसभरात एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन आत्महत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एका संगणक अभियंत्याचा समावेश असून एका घटनेत गृहिणीने आठव्या मजल्यावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली तर आणखी एका ठिकाणी ४० वर्षी व्यक्तीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. प्रशांत नरेंद्र सेठ (वय- ३२) असं संगणक अभियंत्याचे नाव असून कनिका नरेंद्रकुमार शर्मा (वय-३३) आणि गेनदेव बाबुराव काशीद (वय-४०) अशी आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत. संगणक अभियंता प्रशांतने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून यासाठी कोणालाही जबाबदार धरु नये असं म्हटलं आहे. मात्र इतर दोन आत्महत्यांची कारणं समजू शकलेली नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणक अभियंता प्रशांत हे मूळचे मध्यप्रदेश येथील असून राहत्या घरात बेडरूमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घरात पत्नी होती तेव्हा त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये असा उल्लेख त्यांनी केला आहे. हिंजवडी मधील कंपनीत ते संगणक अभियंता म्हणून ते काम करत होते. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

दुसऱ्या आत्महत्येत गृहिणी कनिका शर्मा यांनी दुपारच्या सुमारास आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे कनिका यांचा अडीच वर्षांचा चिमुरडा यावेळी त्यांच्या जवळच होता. कनिका यांनी त्याच्या समोरच उडी घेतली असं पोलिसांनी सांगितले आहे. दिल्लीहून पती आणि नातेवाईक आल्यानंतर आत्महत्येचे कारण समजेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर दुसऱ्या घटनेत खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या गेनदेव बाबुराव काशीद यांनी राहत्या घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांची पत्नी बुधवारी गावी गेली असून त्यांना एक मुलगा आहे असं पोलिसांनी सांगितले. या तिन्ही आत्महत्या वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून नैराश्यातून झाल्या असाव्यात अस पोलिसांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 8:11 pm

Web Title: 3 suicide incidents happen at thursday in pimpri chinchwad area kjp 91 psd 91
Next Stories
1 माऊली न आल्याने खंडेरायाची जेजुरी नगरी सुनी सुनी
2 पैशांच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून
3 पुणे : चीनचा झेंडा जाळत, चायनामेड टीव्ही, मोबाइल फोडून शिवसेनेकडून निषेध व्यक्त
Just Now!
X