जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं करोना बाधितांच्या संख्येच्या दृष्टीने आघाडीवर आहेत.  पुणे विभागातही करोना विषाणूचे रुग्ण संख्या वाढत असून आज अखेर 3 हजार 849 एवढे रुग्ण विभागात आढळले आहेत. त्याच दरम्यान 203  रुग्णांचा मृत्यू झाला   असून, 1 हजार 697  करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले की, पुणे जिल्हयात 3  हजार 352 रुग्ण असून 1 हजार 533 रुग्ण बरे होवून घरी सोडण्यात आले आहे. तर एकूण  178  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 124 रुग्ण असून 39 रुग्ण घरी सोडले आहे. तर त्याच दरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोलापूर जिल्हयात  308 रुग्ण असून 87 रुग्णांना घरी सोडले आहे. आज अखेर 21  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 41 रुग्ण असून 29 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 24 रुग्ण असून 9 रुग्णांना घरी सोडण्यात आहे. त्याच बरोबर आज अखेर एका रुग्णांचा मृत्यू झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

“करोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल,” असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला आहे. “अन्य विषाणूंप्रमाणे करोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही,” असे मायकल जे रेयान म्हणाले. रेयान हे WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.