आर्थिक वादातून भावांकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात एका तरुणाने आत्महत्या केली. अविनाश पवार (वय ३१) असे या तरुणाचे नाव आहे.

पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव येथील बेलठिका परिसरात राहणाऱ्या अविनाश पवार या तरुणाने रविवारी रात्री विषप्राशन करुन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह थेरगाव येथील रॉयल बेकरीच्या समोर आढळला. आर्थिक वादातून भावांकडून सतत मारहाण होत असल्याने आयुष्य संपवत असल्याचे अविनाशने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. अविनाश हा दोन भावांसह थेरगाव येथे राहत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याला भावांकडून सतत मारहाण होत होती. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.