01 October 2020

News Flash

मुलाची आत्महत्या, धक्क्याने आईचाही मृत्यू; पिंपरीतील कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या तन्मय दास गुप्ता (वय ३६) याच्यावर दहा वर्षापासून मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार सुरू होते.

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी- चिंचवड येथे मानसिक आजाराने ग्रासलेल्या तन्मय दास गुप्ताने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या अकाली निधनाने त्याच्या आईलाही धक्का बसला… मुलाच्या विरहाने खचलेल्या आईचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एकाच दिवशी मुलगा आणि आईचा मृत्यू झाल्याने गुप्ता कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या तन्मय दास गुप्ता (वय ३६) याच्यावर दहा वर्षापासून मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार सुरू होते. त्याने गेल्या दोन महिन्यापासून गोळ्या घेतलेल्या नव्हत्या. सोमवारी रात्री आई शुक्ला दास गुप्ता या तन्मयला घेऊन डॉक्टरकडे गेल्या होत्या. त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास तो घरी आला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

स्वतः च्या पोटच्या मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून शुक्ला यांना हृदय विकाराचा झटका आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्ला यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांचा दुसरा मुलगा बेंगळुरू येथे राहतो. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तन्मयने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 3:35 pm

Web Title: 36 year old mentally challenged commits suicide mother dies in shock heart attack
Next Stories
1 पुण्यात किरकोळ वादातून मित्राची हत्या
2 दीड महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून दापोडीत १२ जणांनी केली तरुणाची हत्या
3 VIDEO: सोमवतीनिमित्त जेजूर गडावर चार लाख भाविकांकडून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’
Just Now!
X