28 September 2020

News Flash

पुण्यात दिवसभरात ३७ रुग्णांचा मृत्यू ; १ हजार २९० नवे करोनाबाधित

पिंपरी-चिंचवडमध्ये १८ जणांचा मृत्यू; १हजार १३ नवे करोनाबाधित

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १ हजार २९० नवे करोनाबाधित आढळले, तर ३७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याचबरोबर शहारातील करोनाबाधितांची संख्या ६४ हजार ५७६ वर पोहचली आहे. शहरात आजअखेर १ हजार ५१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ९६१ रुग्णांची तब्येत बरी झाल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ४६ हजार ७३५ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १ हजार १३ करोनाबाधित रुग्ण आढळले, यापैकी २६ करोनाबाधित हे महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील आहेत. तर १८ जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात ५१८ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, शहरातील बाधित रुग्णांची संख्येने आता २८ हजारांचा टप्पा पार केला असून एकूण संख्या २८ हजार ६५ वर पोहचला आहे. पैकी, १९ हजार ३१२ जण करोनामुक्त झाले आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयात ४ हजार ८५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ५ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल १२ हजार ८२२ नवे करोनाबाधित आढळले तर २७५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ५ लाख ३ हजार ८४ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार घेत असलेले १ लाख ४७ हजार ४८ रुग्ण तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या १७ हजार ३६७ जणांचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयच्या हवाल्याने एनएनआयने हे वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 8:57 pm

Web Title: 37 patients die in pune in a day 1 thousand 290 new corona affected msr 87 svk 88 kjp 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 मराठा समाज आरक्षण उपसमितीवरून अशोक चव्हाण यांना हटवा : आमदार मेटे
2 डुक्कराचं मांस खाण्याची जबरदस्ती करत विवाहितेला जीवे मारण्याची धमकी
3 उच्चशिक्षित डॉक्टरची पेटीएमद्वारे फसवणूक; गुन्हा दाखल
Just Now!
X