पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १९३८ रुग्ण आढळल्याने, १ लाख १५ हजार ७७० एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १५७३ रुग्णांची तब्बेत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ९६ हजार ०५ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरीत १ हजारपेक्षा जास्त रुग्णांना करोनाची बाधा

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १ हजार ३३१ जण करोना बाधित रुग्ण आढळले असून ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार २७२ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून ते करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ६१ हजार २३१ वर पोहचली असून पैकी ४६ हजार ९५३ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ४८६ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.