News Flash

पुण्यात महिला सुधारगृहातून ३८ महिलांचे पलायन

सुधारगृहाची तोडफोड करून महिलांचे पलायन, १८ महिला ताब्यात

पुणे जिल्ह्यातील वानवडीमधील महिला सुधारगृहातून ३८ महिला फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व महिलांनी वानवडी सुधारगृहाची मंगळवारी मध्यरात्री तोडफोड करून पलायन केले. महिलांनी सुधारगृह अधिकाऱयालाही मारहाण केल्याचे समजते.
दरम्यान, पळून गेलेल्या ३८ महिलांपैकी १८ महिलांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, २० महिला अद्याप फरार आहेत. यात काही बांगलादेशी महिलांचाही समावेश आहे. पोलिसांची शोध मोहिम सुरू आहे. पण या घटनेमुळे सुधारगृहातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 8:15 am

Web Title: 38 womens abscond from pune wanwadi
Next Stories
1 – ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
2 तूरडाळ घोटाळा प्रकरणी नवाब मलिक यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
3 महापालिका लोकशाही दिनाचा विचका
Just Now!
X