X

धक्कादायक! पुण्यात ४ भटक्या कुत्र्यांना जिवंत जाळले

तर १६ कुत्र्यांना विष देण्यात आले.

पुण्यातील बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रस्त्यावर भटक्या कुत्र्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस अधिक तपास करत आहेत. चार भटक्या कुत्र्यांना जिवंत जाळल्याबरोबरच १६ कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबरला बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रस्त्यावर काही कुत्री मृतावस्थेत असल्याची माहिती एका एनजीओकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हा सर्व प्रकार नक्की कोणी केला, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मृत कुत्र्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Outbrain