23 July 2018

News Flash

बालिकेवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक अत्याचार

पिंपरी भागात अल्पवयीन मुलांकडून सहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पिंपरी भागात अल्पवयीन मुलांकडून सहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. बालन्यायालयाच्या आदेशाने चौघा मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

पीडित बालिकेच्या आईने यासंदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी भागातील एका झोपडपट्टीत अल्पवयीन मुले राहायला आहेत. मुले नववी, सातवी, सहावी आणि पाचव्या इयत्तेत शिकायला आहेत. त्यांचे पालक बिगारी काम करतात. पीडित बालिकेची आईदेखील बिगारी काम करते. शनिवारी ती कामानिमित्त बाहेर गेली होती.  दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलांनी घराच्या बाहेर खेळणाऱ्या सहा वर्षांच्या बालिकेला आडबाजूला नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने सायंकाळी या प्रकाराची माहिती आईला दिली. तिने पिंपरी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतले. रविवारी चौघा मुलांना बालन्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

First Published on November 28, 2016 5:20 am

Web Title: 4 minor boys detained for allegedly raping 6 year old girl in pune