पुणे शहरात आज दिवसभरात ४ हजार ६५३ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, ३९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आता २ लाख ७८ हजार ९९ वर पोहचली आहे. तर आजपर्यंत ५ हजार ३७६ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज ३ हजार ३३७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ३५ हजार ५९७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २ हजार ४६३, तर महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील ३६ जण बाधित रुग्ण आढळले आहेत. १ हजार ५०७ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर १९ रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ४४ हजार ७१४ वर पोहचली आहे. यापैकी, १ लाख २२ हजार ९९० जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ३९८ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज(शुक्रवार) पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारपरिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याची घोषणा केली. तसेच,  पुणे पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार आहे.  पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली.

मोठी बातमी! पुण्यात मिनी लॉकडाउन; संचारबंदीची घोषणा

राज्यात मागील काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र तरी देखील रूग्णसंख्या अटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार ८२७ नवीन करोनाबाधित आढळले असून, २०२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.९१ टक्के एवढा आहे.

Coronavirus – राज्यात दिवसभरात ४७ हजार ८२७ करोनाबाधित वाढले, २०२ रूग्णांचा मृत्यू

दरम्यान आज २४ हजार १२६ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २४,५७,४९४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.६२ टक्के एवढे झाले आहे.