18 January 2021

News Flash

पुण्यात मागील २४ तासात ४०६ तर पिंपरीत २३५ नवे करोना रुग्ण

पुण्यात दोघांचा तर पिंपरीत चौघांचा करोनामुळे मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात दिवसभरात ४०६ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ६८ हजार ८६६ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ४५१ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ३२० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ५९  हजार १४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २३५ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून २२६ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९१ हजार ७५० वर पोहचली असून पैकी, ८७ हजार ८६० जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ९३१ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 9:30 pm

Web Title: 406 new corona cases in pune and 235 cases in pimpri scj 81 svk 88 kjp 91
Next Stories
1 करोना: १०० देशांच्या राजदुतांचा सिरम इन्स्टिट्युटचा दौरा रद्द
2 राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक, शरद पवारांनी घेतली भेट
3 पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X