पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १५०८ रुग्ण आढळले. यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३८६ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आज अखेर एकूण मृत रुग्णांची संख्या ९७६ वर पोहोचली.

त्याचबरोबर करोनावर उपचार घेणार्‍या ७३० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर २२ हजार ६११ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिवसभरात आढळून आलेल्या करोनाबाधितांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, राज्यात आज ९,५१८ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता ३ लाख १० हजार ४५५ इतकी झाली आहे. आज ३,९०६ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण १ लाख ६९ हजार ५६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ लाख २८ हजार ७३० इतकी आहे.