पुणे शहरात दिवसभरात ४११ करोना बाधित रुग्ण आढळले. आज अखेर १ लाख ६५ हजार ८३७ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ४०७ इतकी मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ३१६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ५६ हजार ९५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १७९ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८३ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९० हजार १२५ वर पोहचली असून पैकी, ८६ हजार ८५६ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६२८ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.