पुणे शहरात दिवसभरात ४१६ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ६७ हजार ६०४ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ४४० मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान २१८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ५८ हजार ५४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १८९ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर ७७ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर उपचारादरम्यान दहा जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९१ हजार ३८ वर पोहचली असून पैकी, ८७ हजार ४६१ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ७८१ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.