पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १०३६ रुग्ण आढळल्याने १ लाख ४६ हजार ३२७ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार ५२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ११७०  रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख २६ हजार ४३० रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ६३३ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, १ हजार २३६ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८ हजार ७१४ वर पोहचली असून पैकी, ६६ हजार १३१ जण करोनातून बरे झाले आहे. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार १३९ येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.