05 December 2020

News Flash

पुण्यात दिवसभरात ४३ रुग्णांचा मृत्यू, २ हजार १२० नवे करोनाबाधित

करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २४ हजार ५६८ वर

(प्रतिकात्मक छायाचित्र)

राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. पुणे व मुंबई ही दोन्ही प्रमुख शहर करोनाबाधितांच्या संख्येत आघाडीवर आहेत. पुणे शहरात आज दिवसभरात २ हजार १२० नवे करोनाबाधित आढळले, तर ४३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला.

शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २४ हजार ५६८ वर पोहचली आहे. तर, आजअखेर २ हजार ९१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ८८३ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण १ लाख ३ हजार ९७८ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात आज दिवसभरात २३ हजार ३६५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या ११ लाख २१ हजार २२१ इतकी झाली आहे. दुसरीकडे ४७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या ३० हजार ८८३ इतकी झाली आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. आज दिवसभरात १७ हजार ५५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात असून आतापर्यंत ७ लाख ९२ हजार ८३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ७०.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर २.७५ टक्के इतका आहे. आतापर्यंत ५५ लाख ६ हजार २७६ चाचण्या करण्यात आल्या असून यामधील ११ लाख २१ हजार २२१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 10:11 pm

Web Title: 43 patients die in pune 2120 new corona affected msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 देव तारी त्याला कोण मारी! पिंपरीमध्ये हायटेंशन तारेला चिटकलेला तरूण थोडक्यात बचावला
2 झटपट पैसा कमावण्यासाठी युट्युबवरील व्हिडिओ पाहून छापल्या बनावट नोटा; बहिण-भावाला अटक
3 खळबळजनक! पुण्यात होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
Just Now!
X