21 February 2019

News Flash

राज्यातील ४३८ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांची पुणे लोहमार्ग पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

राज्यातील ४३८ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश मंगळवारी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिले. त्याअंतर्गत पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील ३९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पुणे शहर पोलीस दलातील मिलिंद गायकवाड, प्रतिभा जोशी, स्मिता जाधव, रेहना शेख, सीताराम मोरे, श्रीकांत नवले, राजकुमार वाघचवरे, राजेंद्र तोडकर, सुशील कदम, मसाजी काळे, अरुण सावंत, संदीपान सावंत, जितेंद्र कोळी, बाळासाहेब सुर्वे, सुनील पवार, कल्लपा पुजारी, परशुराम पाटील, अनिल आडे, अशोक थोरात , रवींद्र चौधर, बळवंत काशीद, सुषमा चव्हाण, उज्ज्वला पिंगळे, स्मिता मेहेंदळे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दहशतवाद विरोधी पथकातील अरविंद गोकुळे आणि सुनील तांबे यांची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात बदली क रण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांची पुणे लोहमार्ग पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.
पुणे शहर पोलीस दलात बाहेरुन आलेल्या पोलीस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे- महेंद्र जगताप, संगीता पाटील, कृष्णा इंदलकर, मनीषा झेंडे, विजयकुमार पळसुले, राधिका फडके, राजेंद्र धामणेरकर, दत्तात्रय चव्हाण, जयराम पायगुडे, जानदेव भालसिंग, किशोर म्हसवडे, सतीश गोवेकर, सुनील दरेकर, सोपान मोरे, रामदास खोमणे, राजेंद्र कदम, अशोक कदम, रवींद्र निंबाळकर, दुयरेधन पवार, अनिल गालिंदे, खंडेराव खैरे, राजेंद्र काळे, विनायक साळुंके, रवींद्र भोगावडे, कवीदास जांभळे, भीमराव शिंगाडे, सुहास भोसले, प्रकाश खांडेकर
पुणे ग्रामीण पोलीस दलात आलेले अधिकारी- अरुण जगताप, सुरेश निंबाळकर, मनोजकुमार यादव, सुरेश बोडखे, अरुण मोरे
पुणे ग्रामीण पोलीस दलातून बदली झालेले अधिकारी- शिवाजी देवकर, कैलास पिंगळे, नारायण सारंगकर, अशोक इंदलकर, भागवत मुंढे, हेमंत शेडगे, श्रीकांत खोत

First Published on May 25, 2016 4:09 am

Web Title: 438 senior police inspectors transferred in maharashtra
टॅग Maharashtra Police