News Flash

पुण्यात करोनाची लागण होऊन ४४ मृत्यू, तर पिंपरीत २१ मृत्यू

पुण्यात आत्तापर्यंत ३ हजार रुग्णांचा करोनामुळे मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १८९१ रुग्ण आढळल्याने १ लाख २८ हजार ४२३ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर ३ हजार ७  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १९२६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ८ हजार १२३ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरीत ८४३ नवे रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ८४३ जण करोना बाधित रुग्ण आढळले असून २१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ८६२ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ६८ हजार ४३९ वर पोहचली असून पैकी ५४ हजार २२५ जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ५२२ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 9:22 pm

Web Title: 44 deaths in pune and 21 deaths in pimpri due to corona scj 81 svk 88 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुणे : करोना रुग्णांच्या उपचारामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांना अजितदादांची तंबी, म्हणाले…
2 VIDEO: अजित पवारांकडून पहाटे सहा वाजता पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना
3 दूरशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
Just Now!
X