News Flash

४९ टक्के विद्यार्थ्यांना चाळीस मिनिटांतच कंटाळा

‘ऑनलाइन’ शिक्षणाबाबतच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

(संग्रहित छायाचित्र)

करोना काळात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण प्रक्रिया सुरू असताना भाषा विषयांच्या तुलनेत गणित आणि विज्ञान हे विषय ऑनलाइन पद्धतीने शिकणे कठीण असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तर ४९ टक्के  विद्यार्थ्यांना चाळीस मिनिटांतच कं टाळा येत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

भारतीय शिक्षण मंडळ या संस्थेतर्फे  करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाची माहिती डॉ. वा. वा. गोगटे आणि डॉ. प्रीतम सेलमोकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्य़ांतील सुमारे दोनशे मराठी शाळांत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पाचवी ते आठवीचे १८ हजार ६११ विद्यार्थी, १५ हजार ९११ पालक आणि २ हजार ४६१ शिक्षकांनी सहभाग घेतला होता. १० जून ते ९ फे ब्रुवारी या कालावधीत या सर्वेक्षणाची प्रक्रिया राबवण्यात आली. मुलांबरोबर वेळ घालवता येत असल्याने पालक समाधानी आहेत. ऑनलाइन शिक्षण पुरेसे नसल्याचे मत मांडत पालकांनी करोनानंतर ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षण असावे असा प्रतिसाद नोंदवला.

* ऑनलाइन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ९४ टक्के विद्यार्थी स्मार्टफोनचा वापर करतात.

* ४७ टक्के विद्यार्थ्यांची वाचनाची सवय वाढली, तर ३० टक्के विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाले.

* ४१ टक्के विद्यार्थ्यांच्या लेखनाची सवय वाढली आणि ३४ टक्के विद्यार्थ्यांच्या लेखनाची सवय कमी झाली.

* ५२ टक्के विद्यार्थ्यांना एकटेपणा वाटतो, तर २४ टक्के विद्यार्थ्यांना एकटेपणा वाटत नाही.

* शाळेत असताना मित्रांबरोबरची धमाल, मैदानावरच्या खेळण्याची उणीव विद्यार्थ्यांना जाणवते.

* ऑनलाइन शिक्षणामुळे ६४ टक्के पालकांची चिंता वाढली, तर ३६ टक्के पालकांची चिंता कमी झाली आहे.

* ५७ टक्के शिक्षकांना पीपीटी सादरीकरण आणि चित्रफिती तयार करण्याच्या प्रशिक्षणाची गरज वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 12:21 am

Web Title: 49 per cent of students get bored of online education in just 40 minutes abn 97
Next Stories
1 ‘सीटीईटी’ उमेदवारांना डिजिटल प्रमाणपत्रे
2 Coronavirus – पुण्यात दिवसभरात ६८८ करोनाबाधित वाढले, पाच रुग्णांचा मृत्यू
3 पुणे : पूजा चव्हाण प्रकरणासंदर्भातील प्रश्न ऐकून आयुक्त हसत हसत पत्रकार परिषद सोडून निघून गेले
Just Now!
X