News Flash

हैदराबादमध्ये अडकलेल्या ४९ जणी मूळ गावी

सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांना यश

(संग्रहित छायाचित्र)

सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांना यश

पुणे : नेट-सेट परीक्षेच्या तयारीसाठी हैदराबाद येथे गेलेल्या महाराष्ट्रातील ४९ महाविद्यालयीन युवती गेल्या दीड महिन्यांपासून टाळेबंदीमुळे अडकून पडल्या होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ४९ युवती नुकत्यात महाराष्ट्रात परतल्या आहेत. सुळे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्या सुखरूप मूळ गावी पोहोचल्या.

नेट-सेटच्या तयारीसाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून ४९ महाविद्यालयीन युवती हैदराबाद येथे गेल्या होत्या. टाळेबंदी  लागू झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून ४९ युवती तेथे अडकून पडल्या होत्या. त्यांचे कुटुंबीय काळजीत होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सर्वजणी नुकत्याच मूळ गावी परतल्या आहेत. याबाबत सातारा जिल्ह्य़ातील प्रज्ञा साळुंखे आणि नाशिक जिल्ह्य़ातील येवला भागातील विद्या मामुडे माहिती देताना म्हणाल्या, सर्वजणींनी शास्त्र शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. हैदराबाद येथील एका मार्गदर्शन संस्थेत आम्ही नेट-सेटच्या तयारीसाठी गेलो होतो. प्रशिक्षण वर्ग पूर्ण होण्यास काही दिवसांचा कालावधी राहिला असताना टाळेबंदी लागू झाली. गेल्या दीड महिन्यांपासून आम्ही तेथेच अडकून पडलो होतो.

आमचे कुटुंबीय काळजीत होते. अखेर आम्ही खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला. आम्हाला परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी विनंती त्यांना केली. त्यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाबरोबर चर्चा केली. त्यानंतर आम्हाला परवानगी मिळाली. विशेष गाडीने आम्ही दोन दिवसांपूर्वी आपआपल्या गावी परतलो. सुळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आम्ही मूळ गावी परतलो. आमच्या कुटुंबीयांनी सुळे यांचे मनोमन आभार मानले आहेत, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांकडून ३६ हजार जणांना प्रवासासाठी परवाने

पुणे : टाळेबंदीतील निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून जिल्हा तसेच आंतरराज्य प्रवासासाठी ३६ हजार ३९७ जणांना प्रवासासाठी परवाने देण्यात आले. शहरात नोकरी, व्यवसायानिमित्त स्थिरावलेले नागरिक, विद्यार्थी तसेच वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या नागरिकांना मूळ गावी परतण्याची मुभा मिळाली आहे.

पोलिसांकडून ३४ हजार १९३ नागरिकांना राज्याअंतर्गत प्रवास करण्याची सवलत मिळाली आहे. उर्वरित २ हजार २३४ नागरिकांना राज्याबाहेर प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. याबरोबरच जवळच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने प्रवासासाठी परवानगी मागणाऱ्या १ हजार ९३८ जणांना परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय कारणासाठी ५ हजार ७४ हजार जणांना प्रवासासाठी सवलत देण्यात आली आहे. शहरात अडकलेल्या ८ हजार ४३५ विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आली आहे. टाळेबंदी लागू झाल्यानंतर सुरुवातीला अत्यावश्यक तसेच तातडीच्या कारणासाठी राज्याअंतर्गत तसेच राज्याबाहेर प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत होती. सुरुवातीला वैद्यकीय कारणांसाठी प्रवासी सवलत देण्यात येत होती. टाळेबंदीतील निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता शहरात अडकलेल्या नागरिकांना मूळ गावी परतण्याची सवलत देण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:48 am

Web Title: 49 stranded maharashtra students in hyderabad return to home after efforts of supriya sule zws 70
Next Stories
1 साठ लाखांची ‘नाका बंदी’
2 करोनाविरुद्धच्या लढय़ात ७० हजारांहून अधिक शिक्षक
3 Video: पिंपरी-चिंचवडमधून २८६ परप्रांतीय मजूर एसटी बसने कर्नाटकला रवाना
Just Now!
X