News Flash

पुणे विद्यापीठ परिसरात कुत्र्यांच्या पिल्लांना विष देऊन मारले, गुन्हा दाखल

विष देऊन मारल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.

Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
राजुरा इथे हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहामध्ये जेवणानंतर काही मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला.

पुण्याच्या सेनापती बापट मार्ग सोसायटीजवळ रविवारी पाच कुत्र्यांची पिल्लं मृतावस्थेत आढळून आली. त्यांना विष देऊन मारल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे प्राणीमित्र संतापले आहेत. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कुत्र्याच्या पिल्लांना नक्की कोणी मारले याचा शोध घेण्यासाठी आता या विभागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. पुणे विद्यापीठ परिसरात हा प्रकार घडला आहे.
रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला. पुण्यातील एका समाजसेवी संस्थेने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 3:17 pm

Web Title: 5 dog puppies died poison pune university area
Next Stories
1 पिंपरी येथे दीड वर्षाच्या चिमुकलीने गिळला बटन सेल
2 पुण्यात आघाडी होणार; अजित पवारांचे संकेत
3 एक्सप्रेस वेवर एसटी २० फूट खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी जखमी
Just Now!
X