News Flash

सर्वाना विश्वासात घेतल्याशिवाय कचरा डेपोचे स्थलांतर नाही – उदय सामंत

शहराच्या विकास आराखडय़ात पाच जागा घनकचरा व्यवस्थापनासाठी आरक्षित करण्यात आल्या असून त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूदही केली जाणार आहे.

| July 23, 2013 02:55 am

पुणे शहराच्या विकास आराखडय़ात बाणेर, वडगाव, कोंढवा, हडपसर आणि आंबेगाव येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी भूखंड आरक्षित असून तुळापूर येथील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कचरा डेपो तुळापूरला हलवण्यासंबंधी कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे निवेदन नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधान परिषदेत केले.
शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहराच्या कचरा प्रश्नाबाबत लक्षवेधी सूचना दिली होती.  महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनाबाबत जी आश्वासने देण्यात आली आहेत, ती पाळली जात नसल्याची तक्रार डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी केली. हंजर बायोटेक कंपनीकडून अशास्त्रीय पद्धतीने काम सुरू आहे. त्यामुळे कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी करून तुळापूर येथे छत्रपती संभाजीमहाराज यांचे समाधिस्थान असल्यामुळे उरुळी येथील कचरा डेपो तेथे हलवू नये, अशीही मागणी डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी केली. स्थानिक फुरसुंगी व उरुळी येथील ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार करून कचरा डेपोची पर्यायी व्यवस्था काय करण्यात आली आहे, असाही प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.
राज्यमंत्री उदय सामंत यांनी या वेळी सांगितले, की शहराच्या विकास आराखडय़ात पाच जागा घनकचरा व्यवस्थापनासाठी आरक्षित करण्यात आल्या असून त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूदही केली जाणार आहे. तुळापूर येथील स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. फुरसुंगी तसेच उरुळी येथील नागरिकांना योग्य प्रकारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून ७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील १० टक्के लोकवर्गणीची व्यवस्था पुणे महापालिका करणार आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम संबंधित कंपनीकडून योग्यप्रकारे होत नसेल, तर संबंधित कंपनीची चौकशीही केली जाईल.
चर्चेच्या वेळी आमदार आशिष शेलार, मोहन जोशी, मुजफ्फर हुसैन, दीप्ती चवधरी यांनीही या विषयावर विविध प्रश्न उपस्थित केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2013 2:55 am

Web Title: 5 new places reserved for garbage depot samant
Next Stories
1 खडकवाला, पवना धरणातून पाणी सोडले
2 ‘अनधिकृत संस्था दाखवा.. लगेच कारवाई करू !’ – उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे
3 ..आणि अवतरला ‘अक्की’!
Just Now!
X