17 December 2017

News Flash

FTII च्या ५ विद्यार्थ्यांवर बडतर्फीची कारवाई, ४७ विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस

प्रकल्प वेळेवर जमा न केल्याने कारवाई

पुणे | Updated: October 11, 2017 10:40 PM

संग्रहित छायाचित्र

अभ्यासक्रमातील प्रकल्प वेळेवर पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (FTII) ५ विद्यार्थ्यांवर आज बडतर्फीची कारवाई करण्यात आली. तसेच इतर ४७ विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आजच एफटीआयआयच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्थेतील कला आणि दिग्दर्शन विभागाच्या विद्यार्थ्याना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांनी प्रकल्प वळेवर पूर्ण न केल्यावरुन मागील दोन महिन्यांपासून संस्थेच्या प्रशासनाबरोबर त्यांचा वाद सुरू आहे. वारंवार सांगून देखील वेळेवर काम केले नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी संभाषण नावाचा अभ्यासक्रम तीन दिवसांऐवजी दोन दिवस १२ तासांत पूर्ण करावा असा प्रस्ताव होता. यावरून विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात मतभेद झाले होते. या प्रकरणी झालेल्या बैठकीत पाच विद्यार्थी अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून संस्थेचे हॉस्टेलही सोडण्यास सांगण्यात आले आहे. तर उर्वरीत ४७ विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीसा ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.

बुधवारी FTIIच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली. याच दिवशी विद्यार्थ्यांवर बडर्फीची कारवाई करण्यात आल्याने या विषयाला वेगळे वळण मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र, खेर यांच्या नियुक्तीचा या कारवाईशी काहीही संबध नसून अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

First Published on October 11, 2017 10:35 pm

Web Title: 5 students of ftii resticated and send notices to 47 students