News Flash

ऑनलाईन तिकिटांमध्ये देणार ज्येष्ठ नागरिकांना सवलत

ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन तिकिटांच्या आरक्षणामध्येही ५० टक्के सवलत मिळेल, असे आश्वासन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी दिले,

| November 3, 2013 02:42 am

ऑनलाईन तिकिटांमध्ये देणार ज्येष्ठ नागरिकांना सवलत

ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन तिकिटांच्या आरक्षणामध्येही ५० टक्के सवलत मिळेल, असे आश्वासन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी दिले, अशी माहिती राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक विभागाचे राज्यप्रमुख डॉ. दिलीप घुले यांनी दिली.
राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक विभागाच्या शिष्ठमंडळाने गोरे यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन दिले होते. ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरातील सवलतीची सुविधा ऑनलाईन आरक्षणासाठीही देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी झालेल्या बैठकीसाठी गोरे यांच्यासह सरव्यवस्थापक सूर्यकांत अंबर्डीकर उपस्थित होते. बैठकीमध्ये ई-तिकीट आरक्षण, बैठक व्यवस्थेचे आरक्षण, ज्येष्ठ नागरिकांचा प्रवासी संघटनांमध्ये सहभाग यासारख्या मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. शिष्ठमंडळामध्ये डॉ. राजाराम पवार, डॉ. राज तेंडुलकर, विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2013 2:42 am

Web Title: 50 concession to senior citizens for s t online booking
Next Stories
1 मोदींनी पंतप्रधान व्हावे, लता दीदींची इच्छा!
2 जरुरत पडे तो जीवनभी आपके लिये – नरेंद्र मोदी
3 मोदी पंतप्रधान व्हावेत- लतादीदी
Just Now!
X