News Flash

लग्न सोहळ्याच्या उपस्थिती नियमांत बदल

पोलिसांना समारंभाची सीडी देण्याचे आदेश

पोलिसांना समारंभाची सीडी देण्याचे आदेश

पुणे : करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी विवाह समारंभ आणि गर्दी होणाऱ्या अन्य समारंभांच्या ठिकाणी कडक र्निबध लावले आहेत. लग्न सोहळ्यासह अन्य सभारंभांना ५० लोकांनाच परवानगी देण्यात आली

असून त्यामध्ये कार्यालयाचे कर्मचारी, मदतनीस, भटजी यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच उपस्थित राहणाऱ्या लोकांची यादी विवाह समारंभापूर्वी आणि विवाह झाल्यावर त्याची सीडी पाच दिवसात पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी देशमुख यांनी हे आदेश प्रसृत के ले आहेत. विवाह समारंभ आणि गर्दी होणाऱ्या समारंभांच्या ठिकाणी सुरक्षित वावराचा नियम पाळला जावा, करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये,

याकरिता हे कडक र्निबध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार विवाह समारंभाच्या ठिकाणी विविध र्निबध लागू के ले आहेत. विवाह समारंभाला ५० लोकांची उपस्थिती हा नियम पूर्वीपासूनच आहे. मात्र, आता वधू आणि वर पक्ष यांच्याकडून समारंभासाठी येणाऱ्या नातेवाइकांबरोबरच वाजंत्री, भटजी, आचारी, मदतनीस यांचीही गणना के ली जाणार आहे. या सर्वाची यादी स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याची अट घालण्यात आली आहे.

विवाह समारंभाला उपस्थित राहणाऱ्यांनी कार्यालयात बसताना आणि जेवताना सुरक्षित अंतर राखावे, त्यासाठी प्रत्येकी सहा फु टांवर खुणा करण्यात याव्यात. जेवण करताना मुखपट्टी काढल्यानंतर एकमेकांशी गप्पा मारू नयेत, असेही आदेशात नमूद के ले आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच कार्यालयाचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकारी देशमुख यांनी प्रसृत के लेल्या आदेशात दिला आहे.

समारंभाची सीडी पाच दिवसांत देणे बंधनकारक

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विवाह समारंभाच्या ठिकाणी कार्यालयाचे मालक किं वा व्यवस्थापकांनी कोणकोणत्या सुविधांची व्यवस्था करायची, याबाबतही आदेशात सूचना के ल्या आहेत. त्यामध्ये कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, मोबाइल क्रमांक आणि स्वाक्षरी घेण्याचे बंधन आहे. येणाऱ्या नागरिकांचे शरीर तापमान मोजण्याची यंत्रणा उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. तसेच विवाह समारंभ झाल्यानंतर त्याची सीडी कॅ सेट पाच दिवसांत स्थानिक पोलिस ठाण्याला देण्याचेही बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 1:45 am

Web Title: 50 people allowed to attend the wedding in pune zws 70
Next Stories
1 करोना काळातील १० वे अवयवदान यशस्वी
2 ११ ऑक्टोबर, १ आणि २२ नोव्हेंबरला परीक्षा
3 नव्या शैक्षणिक धोरणाचा ऊहापोह
Just Now!
X