News Flash

खडकवासलात मुबलक पाणी

धरणसाखळी प्रकल्पांत ५० टक्के  पाणीसाठा; गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक साठा

धरणसाखळी प्रकल्पांत ५० टक्के  पाणीसाठा; गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक साठा

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत सध्या ५० टक्के  पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिलच्या मध्यात एवढा पाणीसाठा गेल्या पाच वर्षांत प्रथमच धरणांमध्ये उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे यंदा पावसाळ्यापर्यंत धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असणार आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा के ला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये मिळून एकू ण १४.६४ अब्ज घनफू ट (टीएमसी) म्हणजेच ५०.२२ टक्के  पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या ग्रामीण भागासाठी सिंचन आवर्तन सुरू असल्याने नवीन मुठा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. ग्रामीण भागाचे एक आवर्तन कमी करण्यात आल्याने सध्या सुरू असलेल्या आवर्तनातूनच जास्त पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने के ले आहे. तरीदेखील यंदा पावसाळ्यापर्यंत पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहणार आहे.    दरम्यान, गेल्या वर्षी झालेला चांगला आणि लांबलेला पाऊस, पावसाळ्यानंतरही अधून-मधून होत असलेला पाऊस यामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पाबरोबरच जिल्ह्य़ातील पवना, डिंभे, चासकमान, भामा आसखेड, निरा देवघर, भाटघर, वीर आणि उजनी अशा इतर धरणांमध्येही पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी (कं सात टक्क्यांमध्ये)

टेमघर ०.४५ (१२.१५), वरसगाव ६.७१ (५२.३१), पानशेत ६.८१ (६३.९०), खडकवासला ०.६८ (३४.३२), पवना ४.१० (४८.२०), डिंभे ५.९९ (४७.९३), चासकमान ३.३६ (४४.४१), भामा आसखेड ४.४२ (५७.६५), निरा देवघर ४.७२ (४०.२३), भाटघर ११.५९ (४९.३३), वीर ५.७१ (६०.६८) आणि उजनी १५.५२ (२८.९७)

१२ एप्रिल रोजीचा गेल्या पाच वर्षांतील साठा

वर्ष          पाणीसाठा टक्के       टीएमसी

२०२१      १४.६४                       ५०.२२

२०२०      १३.५८                       ४६.५८

२०१९      ८.९६                         ३०.७५

२०१८      ११.७७                       ४०.३५

२०१७      १०.१४                        ३४.७८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 1:25 am

Web Title: 50 percent water remaining in all the four dams in the khadakwasla zws 70
Next Stories
1 करोनाच्या संसर्गात पाडव्याच्या खरेदीसाठी झुंबड
2 पाडव्याला आंबा महाग!
3 जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेमडेसिविरसाठी देण्यात आलेले पत्ते, क्रमांक संपर्क  क्षेत्राच्या बाहेर
Just Now!
X