पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण ९५ टक्के भरले असल्याने, बुधवारी  संध्याकाळी धरणामधुन ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.  तसेच धरण क्षेत्रात पाऊस अजुनही सुरु आहे. तर, उद्या पहाटे आणखी १७०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती  कार्यकारी अभियंता पी बी शेलार यांनी दिली आहे.

आठवडाभरापासून पुण्यात पाऊस नियमीत हजेरी लावत असल्याने धरणसाठ्यात वाढ झाली आहे. शिवाय यापुढे देखील पावसाचे प्रमाण कायमच राहणार असल्याने पाण्याचा आणखी विसर्ग केला जाणार असल्याचे दिसत आहे.  बुधवारी देखील दुपारनंतर पुणे शहर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली होती.