पुणे शहरात दिवसभरात ५२८ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ६९ हजार ३९४ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान सात रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ४५८ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ४१५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ५९ हजार ४२९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २१७ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून १७७ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर उपचारादरम्यान सात जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९१ हजार ९६७ वर पोहचली असून पैकी, ८८ हजार ३७ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ९६५ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.