आठ दिवसांत तीन लाख ६० हजार जणांना लशींची मात्रा

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील लसीकरणाचा ५७ लाखांचा टप्पा बुधवारी (२१ जुलै) पार पडला. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत शहरासह जिल्ह्य़ात ५७ लाख चार हजार जणांचे लसीकरण झाले होते. त्यापैकी पहिली मात्रा ४३ लाख ७२ हजार, तर दुसरी मात्रा १३ लाख ३१ हजार जणांना देण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांत शहरासह जिल्ह्य़ात तीन लाख ६० हजार ८८२ जणांचे लसीकरण करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागाची लोकसंख्या ९४ लाख २६ हजार २५९ एवढी आहे. गेल्या दहा वर्षांचा विचार करता सध्या शहरासह जिल्ह्य़ाची एकू ण लोकसंख्या सव्वा कोटींच्या घरात आहे. त्यातील १८ वर्षांवरील सर्वाचे लसीकरण करणे आवश्यक आहे. २१ जुलैपर्यंत ५७ लाखांपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात यश मिळाले आहे. जिल्ह्य़ाच्या एकू ण लोकसंख्येच्या निम्म्या नागरिकांना किमान लशीची एक मात्रा जुलैअखेपर्यंत दिली जाईल. पुण्यात लशींचा पुरवठा अपवाद वगळता सुरळीत होत असल्याने लसीकरणास वेग आला आहे. दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील २४ लाख ८२ हजार १८५, ४५ ते ६० वयोगटातील १७ लाख ९५ हजार १७५ आणि ६० पेक्षा जास्त वयोगटाच्या  १४ लाख २६ हजार ४२२ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण आतापर्यंत करण्यात आले आहे. पुणे शहरात १९७, पिंपरी-चिंचवडमध्ये ८५, तर ग्रामीण भागात ४१७ अशा ६९९ लसीकरण के ंद्रांवर लसीकरण सुरू आहे. दररोज १.२५ लाख नागरिकांना लस देण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याप्रमाणात लशी उपलब्ध झाल्यास संपूर्ण जिल्ह्य़ाचे लसीकरण लवकरच पूर्ण होऊ शके ल आणि मृत्युदरात घट होण्यास मदत होईल, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.