दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून तलवार, कोयते अशी शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत. दरोड्याच्या तयारीत असलेल्या या टोळीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. आठपैकी सहा जणांना पोलिसांनी अटक केली. कुंडलिक शेखर, रामेश्वर पांचाळ, शुभम निर्मळे, रुपेश देवकर, गजानन फाजगे, दयानंद सुरवसे अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरातील गवळी उद्यान येथील बाबर पेट्रोल पंपावर दरोड्याचा तयारीत काही इसम हे रस्त्यावर थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संबंधित माहितीची खात्री करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पात यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून सदर ठिकाणी सापळा लावण्यात आला. तेव्हा, तीन वाहने आणि काही इसम त्या ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना पत्ता लागू न लागू देता त्यांच्यावर छापा टाकला. आठपैकी सहा जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले तर दोन जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. आरोपींकडे तलवार, लोखंडी कोयते, सहा प्राणघातक हत्यारे, सहा कापडी मास्क आढळून आले. त्यांच्यावर आर्म अॅक्टनुसार आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर दोन आरोपींचा शोध खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी घेत आहेत.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 
girl rescued within twelve hours
अपहरण झालेल्या पाच वर्षीय मुलीची बारा तासांत सुटका