पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ७०३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आणि २२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ४६१ रुग्ण आढळून आले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ५३ हजार ६०० वर पोहोचली आहे. तर आज अखेर ३ हजार ८०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्या १११७ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ३६ हजार ४९२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
तर पिंपरी-चिंचवडमध्ये ५२९ जण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. इथे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८३ हजार ४३३ वर पोहचली असून यांपैकी ७७ हजार ७६६ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ७०३ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 9:27 pm