News Flash

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन किमान ७५ टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार

(संग्रहित छायाचित्र)

 

किमान ७५ टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन किमान ७५ टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) स्पष्ट केले आहे.

सीबीएसईकडून या संदर्भातील परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. सीबीएसईने देशभरातील शाळांना १८ जुलैला परिपत्रक पाठवून विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के  उपस्थिती असण्यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या. आता सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने सीबीएसईकडून पुन्हा सूचना देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 1:32 am

Web Title: 75 attendance is compulsory for class xxii students abn 97
Next Stories
1 कोणत्या विषयातलं मुख्यमंत्र्यांना कळतं?
2 रेल्वेच्या मोबाइल तिकिटांवर पाच टक्के सूट
3 कॅटमध्ये दहा विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाइल
Just Now!
X