22 November 2019

News Flash

अश्लील व्हिडिओ दाखवून ८ वर्षांच्या मुलीवर उच्चशिक्षित तरूणाकडून लैंगिक अत्याचार

मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर नराधम तरूणाला अटक करण्यात आली आहे

(सांकेतिक छायाचित्र)

पिंपरीमध्ये एका उच्चशिक्षित तरूणाने आठ वर्षांच्या मुलीला अश्लील चित्रफित दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. स्वामी व्यंकटेश विजयकुमार असे या २५ वर्षीय आरोपीचे नाव आहे. वाकड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आईने वारंवार बजावलेले असतानाही ही आठ वर्षांची मुलगी व्यंकटेशच्या घरी मोबाईलवर गेम खेळण्यासाठी जात होती. व्यंकटेश हा उच्चशिक्षित आहे अॅडिशनल कोर्स करण्यासाठी तो पिंपरीत आला. तो भाड्याच्या खोलीत मित्रासह वास्तव्य करत होता. पीडित मुलगी व्यंकटेशच्या खोलीशेजारी असलेल्या घरात रहात होती. आईने वारंवार सांगूनही ती त्याच्या घरी मोबाईलवर गेम खेळण्यास जात असे.

व्यंकटेशकडे जायचं नाही हे सांगत आईने तिला चोपही दिला होता. तसेच तिला रागावलीही होती. मात्र आईला न सांगता ही मुलगी व्यंकटेशकडे जात होती. गेल्या आठवड्यात व्यंकटेशच्या खोलीत कोणीही नव्हतं, त्याचवेळी ही पीडित मुलगी गेली. त्यावेळी व्यंकटेशने या मुलीला मोबाईलवर अश्लील चित्रफित दाखवली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. व्यंकटेशकडे गेलो हे सांगितले तर आई आपल्याला रागवेल म्हणून या मुलीने घडला प्रकार सांगितला नाही.

काही दिवसांनी मुलगी तिचा पार्श्वभाग भिंतीला घासू लागली त्यावेळी तिच्या आईला शंका आली. त्यावेळी मुलीकडे विचारणा केली असता मुलीने व्यंकटेशने काय केलं ते सांगितलं. सगळा प्रकार समजल्यानंतर आईने मुलीला घेऊन थेट वाकड पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी महिला कौन्सिलरने मुलीला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. तिच्या हाती खेळण्यातली बाहुल देण्यात आली. आपल्यासोबत काय घडलं ते या मुलीने बाहुलीच्या मदतीने सांगितलं. ज्यानंतर पोलिसांनी व्यंकटेशला अटक केली.

 

First Published on June 18, 2019 12:44 pm

Web Title: 8 year old girls sexual harassment by 25 year old youth in pimpri scj 81
Just Now!
X