15 October 2019

News Flash

पुण्यात ८०० किलो गांजा जप्त; सीमाशुल्क विभागाची सर्वात मोठी कारवाई

एक कंटेनर गांजा घेऊन पुण्याकडे येत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती.

पुणे : अंमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ८०० किलो गांजा जप्त करण्यात आला. ही धाडसी कारवाई केलेले पथकाचे सदस्य कर्मचारी. त्यांच्यामागे जप्त करण्यात आलेली गांजीची पोती.

पुण्यातील हडपसर भागात सीमाशुल्क विभागाच्या पथकाने आजवरची सर्वात मोठी कारवाई करीत तब्बल ८०० किलो गांजा जप्त केला आहे. एक कंटेनर गांजा घेऊन पुण्याकडे येत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ओडिशा राज्यातून मुंबईकडे एक कंटनेर मोठ्या प्रमाणावर गांजा घेऊन चालला असल्याची अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार हडपसर येथे सापळा रचण्यात आला. संबंधीत कंटनेर येथे दाखल होताच त्याला थांबवून झडती घेतल्यानंतर त्यात पोत्यांमध्ये भरलेला तब्बल ८०३ किलो गांजा आढळून आला. याची किंमत ७० लाख रुपये आहे.

हा गांजा जप्त करीत बाबू सिंग (वय ३०, राजस्थान) आणि शैलेश राव (वय २६, ओडिशा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुण्यातली हीसर्वांत मोठी अंमली पदार्थ जप्तीची कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.

First Published on January 11, 2019 1:35 am

Web Title: 800 kg of ganja seized in pune largest action of the customs department