पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ८०७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर पिंपरीत २७६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. पुण्यातील रुग्णांची संख्या आता  १९ हजार ८४९ झाली आहे. तर आज दिवसभरात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमुळे पुण्यात आत्तापर्यंत ६८५  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ६१९ जणांची  तब्बेत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १२ हजार २९० रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरीतही वाढला कहर

पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने २७६ करोना बाधित रुग्ण आढळले असून शहरातील बाधितांची संख्या ३ हजार ७७६ वर पोहचली आहे. तर आज ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक मृत्यू हा हा ग्रामीण भागातील आहे. पिंपरीत आत्तापर्यंत ८५ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. तसंच आजवर २ हजार २३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजही ७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.