20 September 2020

News Flash

ऑनलाइन परीक्षेला पसंती

८५ टक्के विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षा पर्यायाची निवड

संग्रहित छायाचित्र

८५ टक्के विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षा पर्यायाची निवड

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या पर्यायातून जवळपास ८५ टक्के  विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेला पसंती दिली आहे. एकूण १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला असून, त्यापैकी सुमारे १ लाख ९ हजार विद्यार्थ्यांनी मोबाइलद्वारे परीक्षा देणार असल्याचे नमूद के ल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली.

सर्वोच्च न्यायालयाने पदवीच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापीठाने १ ऑक्टोबरपासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, ऑनलाइन परीक्षेसाठी सुविधांची अडचण लक्षात घेऊन विद्यापीठाने विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन यातून पर्याय निवडण्यास सांगितले होते. त्यासाठी १४ सप्टेंबपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार सोमवार सायंकाळपर्यंत संकलित झालेल्या माहितीनुसार ८५ टक्के  विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेला पसंती दिली आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्य़ातील महाविद्यालयांतील अंतिम वर्षांचे जवळपास २ लाख ४० हजार  विद्यार्थी आहेत. त्यातील १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेला पर्याय निवडला. त्यापैकी १ लाख ९ हजार विद्यार्थ्यांनी मोबाइलद्वारे परीक्षा देणार असल्याचे नमूद के ले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी लॅपटॉप, संगणक, टॅब्लेटद्वारे परीक्षा देणार असल्याचे सांगितले आहे. तर ऑफलाइन परीक्षेसाठी ३८ हजार विद्यार्थ्यांनी तयारी दर्शवली आहे, अशी माहिती परीक्षा विभागाने दिली.

ऑनलाइन परीक्षेच्या तयारीसाठी सराव चाचणीची संधी

ऑनलाइन परीक्षा अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी नवीन असल्याने त्यांना तयारीसाठी सुविधा दिल्या जाणार आहेत. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना तयारीसाठी नमुना प्रश्नसंच पुढील काही दिवसांत दिला जाणार आहे. तसेच ऑनलाइन परीक्षेची तयारी होण्याच्या दृष्टीने त्यांना सराव चाचणी परीक्षेची (मॉक टेस्ट) सुविधाही उपलब्ध करून देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या प्र कु लगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने घेतल्याचे डॉ. काकडे यांनी स्पष्ट के ले.

करोना संसर्गाच्या काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणे महत्त्वाचे आहे. ऑनलाइन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य जपले जाईल. विद्यार्थ्यांचा कलही ऑनलाइन परीक्षेकडे असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन परीक्षेमुळे विद्यार्थी घरातूनच परीक्षा देणार असल्याने पालकांमध्ये असलेली काळजी आणि संभ्रमही दूर होईल.

– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 1:10 am

Web Title: 85 percent of students choose online exam option zws 70
Next Stories
1 सेंटर फॉर बायोफार्मा अ‍ॅनालिसिस प्रयोगशाळेची पुण्यात स्थापना
2 Coronavirus : शंभर चाचण्यांमागे ३० करोनाबाधित
3 लोकजागर : निलाजरी आरोग्यव्यवस्था
Just Now!
X