News Flash

पिंपरी-चिंचवड शहरात आढळले ८९ नवे करोनाबाधित; दोघांचा मृत्यू

शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार १७ वर पोहचली

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी-चिंचवड शहरातील करोना संसर्गामुळे परिस्थती अधिकच बिकट होत चालली आहे. शहरात आज नव्याने सर्वाधिक ८९ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर ६० वर्षीय महिलेचा आणि ६२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार १७ वर पोहचली आहे. दरम्यान, आज दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी नव्याने ८९ करोना बाधित रुग्ण आढळले असून नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दिवसेंदिवस शहरातील बाधितांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आणि हद्दी बाहेरील एकूण १०१७ जण करोना बाधित आहेत. पैकी, ५१६ हद्दीतील तर हद्दीबाहेरील ७५ जणांना करोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. दरम्यान, आत्तापर्यंत ३७ जणांचा मृत्यू करोना विषाणूमुळे झालेला आहे.

आज बाधित आढळले रुग्ण हे भाटनगर, पिंपरी, दापोडी, वाकड, आनंदनगर चिंचवड स्टेशन, साई बाबा नगर चिंचवड, खराळवाडी, काळभोरनगर, नेहरुनगर, काळेवाडी, नानेकर चाळ, पिंपरी रेल्वेस्टेशन, बौध्दनगर पिंपरी, चिंचवडगाव, भोसरी, अंजठानगर, वाल्हेकरवाडी, दिघी, बोपखेल, मोरवाडी, औंध, चाकण व केंदुर पाबळ येथील रहिवासी आहेत. तर आनंदनगर चिंचवडस्टेशन, सदगुरुनगर वाकड, जुनी सांगवी येथील रहिवासी असलेले कोविड-१९ बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मृत्यू झालेले रुग्ण हे कासारवाडी आणि खराळवाडी परिसरातील रहिवासी होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 7:54 pm

Web Title: 89 new corona affected in pimpri chinchwad death of both msr 87 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पालखी प्रस्थान सोहळ्यास मंदीर परिसरात ५० लोकांच्या उपस्थितीस परवानगी
2 मान्सून आला! मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा अंदाज
3 यंदा भाविकांनी थेट प्रेक्षपणाद्वारेच माऊलींना सेवा अर्पित करावी : पोलीस उपायुक्त स्मिता पाटील
Just Now!
X