News Flash

बेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड

वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

(संग्रहित छायाचित्र)

वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून वाहतूक पोलिसांकडून ९१ लाख ३६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी १० ते १६ ऑगस्टदरम्यान शहरात विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. मद्य पिऊन वाहने चालवणे, सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावणे, दुचाकीच्या सायलेंसरचे आवाज, अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात दंडात्मक कारवाई केली. विशेष मोहिमेत नियमभंग करणाऱ्या ४० हजार ७३५ वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून ९१ लाख ३६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

भरधाव वाहने चालविल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 5:08 am

Web Title: 91 lakh penalty for non compliant drivers
Next Stories
1 एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
2 पाणी पुरेना आणि म्हणे..
3 ‘मार्केट यार्डा’तील कोंडी कायम
Just Now!
X