पुणे : रेमडेसिविर इंजेक्शन आपल्या रुग्णाला मिळावे यासाठी रुग्णांच्या कु टुंबातील सदस्य प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाच रेमडेसिविर शिवायही रुग्ण करोनामुक्त होतात हे ९१ वर्षीय आजोबांनी दाखवून दिले आहे. शहरातील साईस्नोह करोना उपचार केंद्रात हे आजोबा उपचार घेत होते. मंगळवारी त्यांच्यावरील उपचार पूर्ण झाले, त्यानंतर रुग्णालयाने प्रेमपूर्वक त्यांना घरी सोडले.

साईस्नोह रुग्णालयाचे डॉ. सुनील जगताप म्हणाले, ९१ वर्षांचे आजोबा आमच्याकडे उपचारांसाठी आले, तेव्हा त्यांना इतर गुंतागुंतीचे विकार नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे तुलनेने सोपे होते. त्यांना सुरळीत प्राणवायू दिला त्याचा बराच उपयोग झाला.

या काळात रेमडेसिविरची असलेली गरज आणि उपलब्धता यांचे प्रमाण कायम व्यस्तच राहिले. त्यामुळे के वळ रेमडेसिविरच्या मागे न लागता इतर सर्व पर्यायही आम्ही वापरले. प्राणवायू, रक्त पातळ करण्याची औषधे, काही रुग्णांच्या उपचारांसाठी योग्य वेळी अँटी फं गल औषधे यांचा उपयोग झाला. रुग्णांवर उपचारांसाठी रेमडेसिविर उपयुक्त आहे. त्याची गरजही आहे, मात्र के वळ त्याचाच आग्रह धरणे चूक आहे. रेमडेसिविर मिळत नसेल तर प्राणवायू, अल्प प्रमाणात स्टिरॉइड या गोष्टीही रुग्ण बरा करण्यास उपयुक्त ठरतात, असेही डॉ. जगताप यांनी स्पष्ट के ले.