पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ९१९ करोनाबाधित रुग्ण आढळले असून १६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, करोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या १६७ रुग्णांना आज घरी सोडण्यात आले.

दरम्यान, शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या २० हजार ३१७ वर पोहचली आहे. यांपैकी आत्तापर्यंत १२ हजार ४४५ जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ३ हजार ३०३ सक्रिय रुग्ण आहेत. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दिली आहे.

राज्यात दिवसभरात ११ हजार १४७ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णनोंद आहे. यासोबत एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ४ लाख ११ हजार ७९८ इतकी झाली आहे. यामधील २ लाख ४८ हजार ६१५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून १ लाख ४८ हजार १५० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के इतका आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दिवसभरात ८८६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २ लाख ४८ हजार ६१५ उपचारानंतर पूर्ण बरे झाले असून घऱी पाठवण्यात आलं आहे. राज्यातील रिकव्हरी रेट सध्या ६०.७३ टक्के इतका आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ५४६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.