पुणे विभागासाठी या वर्षीचा दहावीचा निकाल समाधानकारक ठरला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी गेल्या सात वर्षांमधील सर्वाधिक म्हणदे ९२.३५ टक्क्य़ांवर गेली आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत पुणे एक पायरी वर सरकले आहे; मुंबई विभागाला मागे टाकून पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. नेहमीप्रमाणे या वर्षीही मुलींचे उत्तीर्ण टक्केवारीचे प्रमाण मुलांच्या तुलनेत जास्त आहे.पुणे विभागात या वर्षी एकूण २,७३,७७१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २,३९,१२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८७.३४ इतकी आहे. नियमित परीक्षेस एकूण २,५४,५५३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एकूण २,३५,०९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९२.३५ टक्के आहे. एकूण १९,२१८ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली होती. त्यापैकी एकूण ४,०३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी २०.९८ टक्के आहे.निकालाच्या टक्केवारीच्या दृष्टीने यंदा कोकण, कोल्हापूर, पुणे हे विभाग अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी कोकण, कोल्हापूर, मुंबई व पुणे असा क्रम होता. आता पुण्याचे एक पाऊल पुढे पडले आहे. मुंबई विभाग पाचव्या क्रमांकावर गेला आहे. जिल्हावार उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी :जिल्हा बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारीपुणे १,२६,३२२ १,१८,०५३ ९३.४५अहमदनगर ६९,०८८ ६४,१८३ ९२.९०सोलापूर ५९,१४३ ५२,८५४ ८९.३७पुण्यातही विद्यार्थिनींची बाजी (नियमित परीक्षार्थी) : बसलेले उत्तीर्ण टक्केवारीविद्यार्थी १,४१,६०६ १,२८,३३६ ९०.६३विद्यार्थिनी १,१३,३०० १,१२,९४७ ९४.३५ एकूण २,५५,४२७ २,५४,५५३ ९२.३५गेल्या सात वर्षांची टक्केवारीवर्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी२०१४ ९२.३५२०१३ ८२.२२२०१२ ८५.१२२०११ ८०.३९२०१० ८३.९४२००९ ८३.४६२००८ ८७.८९२००७ ७३.४६श्रेणीनिहाय टक्केवारीजिल्हा विशेष श्रेणी प्रथम द्वितीय उत्तीर्णपुणे ३३,२९३ ४४,३८१ ६,१५१ ६,१५१अहमदनगर १६,१६१ २६,३६९ १८,९८४ २,६६९सोलापूर ११,१८४ १८,६४४ १८,०९१ ४,९३५