News Flash

पुण्यात दिवसभरात आढळले ९३७ रुग्ण, १४ रुग्णांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने ३१४ करोनाबाधित

प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ९३७ रुग्ण आढळले. यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या १९ हजार ४२ एवढी झाली आहे. तर दिवसभरात १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ६७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ६३१ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ११ हजार ६७१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने ३१४ करोनाबाधित रुग्ण आढळले असून शहरातील एकूण बाधितांची संख्या ३,५४४ वर पोहचली आहे. त्याचबरोबर आज १६८ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत २ हजार ३४८ जण करोनामुक्त झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 10:41 pm

Web Title: 937 patients were found in pune during the day 14 patients died aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुण्यात भाजपाकडून भरमसाठ वीज बिलांविरोधात आंदोलन
2 परदेशातून आलेली महिला थेट पोहोचली कोथरुडमधील घरी, क्वारंटाइन होण्यास दिला नकार; नंतर…
3 ‘सारथी’साठी केंद्राकडून निधीची प्रतीक्षा, संस्था बंद होऊ देणार नाही – वडेट्टीवार
Just Now!
X