पुण्यात आज दिवसभरात ९६३ नवीन करोनाबाधित आढळले, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या २ लाख ७ हजार ३४६ झाली आहे. आजपर्यंत ४ हजार ८८५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ६४९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १ लाख ९६ हजार १ जण करोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण आता अधिकच झपाट्याने वाढत आहे.  दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत आहे. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. आज(शनिवार) राज्यात १० हजार १८७ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.३७ टक्के एवढा आहे. तर, आज ६,०८० रुग्ण बरे होऊन घरी देखील गेले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९२ हजार ८९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण आता अधिकच झपाट्याने वाढत आहे.  दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत आहे. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. आज(शनिवार) राज्यात १० हजार १८७ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३७ टक्के एवढा आहे. तर, आज ६,०८० रुग्ण बरे होऊन घरी देखील गेले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९२ हजार ८९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.