19 September 2020

News Flash

धक्कादायक! व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून तरुणाला ११ व्या मजल्यावरुन फेकले, पुण्यातील घटना

पीडित तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे

पुण्यातील कोंढवा परिसरात व्याजाचे पैसे न दिल्याने एका तरुणाला ११ व्या मजल्यावरुन खाली फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सागर चलवेरी असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी अभिनव जाधव, अक्षय गोरडे आणि तेजस गोरडे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील कूल उत्सव सोसायटीमध्ये मृत तरुण सागर आरोपींसोबत गेल्या काही महिन्यांपासून एकत्र राहत होता. मयत सागर चलवेरी याने तिघा मित्रांकडून १५ हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. हे पैसे सागर सोमवारी देणार होता. पण तो देऊ शकला नाही. यावरुन तिघांनी त्याला पैसे कधी देणार असा जाब विचारत बेदम मारहाण केली.

मारहाणीदरम्यान सागरला इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून ढकलून देण्यात आले. या घटनेत सागरचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणांकडे अधिकचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 5:09 pm

Web Title: a boy pushed from 11th floor over money issue cause death in pune svk 88 sgy 87
Next Stories
1 पुण्यात धुळवडीदरम्यान तुफान राडा, दोन गटात हाणामारी; रस्त्यावर उभ्या गाड्यांची तोडफोड
2 गंध लावू नका अक्षदा टाका! अजित पवार यांना करोनाची धास्ती
3 Coronavirus: पुणेकरांनो परदेशात जाऊन आला असाल आणि ‘ही’ लक्षणे दिसत असतील तर…
Just Now!
X