23 January 2021

News Flash

पिंपरी-चिंचवड : डांगे चौकात तरुणीवर प्रियकराने केले धारदार शस्त्राने वार

या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड : डांगे चौकात तरुणीवर धारदार शस्त्राने वार करणारा प्रियकर विकास शेटे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भर चौकात प्रेमवेड्या तरुणाने प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले आहे. तर जखमी प्रेयसीवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, विकास शांताराम शेटे (वय २३) असे हल्लेखोर प्रियकराचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विकास हा प्रेयसीकडे वारंवार विवाहासाठी तगादा लावत होता. याच वादातून त्याने प्रेयसीवर वार केल्याचे सांगण्यात येत आहे.

या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेली २१ वर्षीय प्रेयसी डांगे चौकातील एका खासगी रुग्णालयात नोकरी करते. आज सकाळी दहाच्या सुमारास ती कामावर जात असताना तिच्या मागावर असलेल्या विकासने तिच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले, यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

विकास आपल्या प्रेयसीकडे विवाह करण्यासाठी तगादा लावत होता. त्यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते. त्यामुळे प्रेयसीने वैतागून विकासचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. ती विकासला टाळण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे चिडलेल्या विकासने तिचा पाठलाग केला आणि आज सकाळी डांगे चौक येथे तिला गाठले. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 12:43 pm

Web Title: a boy to strike with a sharp weapon on girl at dange chowk pimpri chinchwad aau 85
Next Stories
1 पुणे: उधारीच्या पैशांवरुन वाद, तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या
2 डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर आम्ही गोळया झाडल्या, कळसकरची न्यायवैद्यकीय चाचणीत कबुली
3 शहरातील चार कचरा प्रक्रिया प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद
Just Now!
X