News Flash

काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

सुनेचा छळ केल्या प्रकरणी वानवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांच्यासह चौघांवर, सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहा अभिजीत शिवरकर (वय-३७ फातिमानगर) असे फिर्यादी सुनेचे नाव आहे. सासरे बाळासाहेब शिवरकर, पती अभिजीत, सासू कविता आणि सोनाली परदेशी या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अभिजीत शिवरकर यांनी आमच्याकडे तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती अभिजीत यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती स्नेहा यांना मिळाली. या गोष्टीचा जाब त्यांनी अभिजीत यांना विचारला असता, त्यांना योग्य उत्तर दिली गेली नाही. त्यावरून २००९ ते २०१९ दरम्यान स्नेहा यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तसेच त्यांना मारण्याची देखील धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अखेर त्यांनी आमच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार सासरे बाळासाहेब शिवरकर, पती अभिजीत, सासू कविता आणि सोनाली परदेशी या चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 7:27 pm

Web Title: a case has been registered against four persons including former congress mla balasaheb shivarkar msr 87 svk 88
Next Stories
1 पुणे : मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खाणीत बडून मृत्यू
2 मोदी सरकारला आत्मसंतुष्टता भोवली!
3 “राजकीय पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपात मराठा समाजाचं नुकसान”
Just Now!
X